Pimpri Corona Update : शहरात आज 314 नवीन रुग्णांची नोंद, 300 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 314 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 300 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 9 आणि महापालिका हद्दीबाहेरील 9 अशा 18 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 193 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 52 हजार 978 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 2 हजार 945 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 176 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 769 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 106 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 771 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 690 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 19 हजार 52 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.