Pimpri corona Update : शहरात आज 315 नवीन रुग्णांची नोंद, 261 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 288 आणि महापालिका हद्दीबाहेरील 27, अशा 315 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 72 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 261 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा महापालिका रुग्णालयात आज मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 1 लाख 6245 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 1 लाख 945 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1850 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 776 अशा 2626 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 1267 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 701 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 24 हजार 758 जणांनी लस घेतली. आज दिवसभरात 1387 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.