Pimpri corona Update : शहरात आज 468 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 453 आणि महापालिका हद्दीबाहेरील 15 अशी 468 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण असून ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 77 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 457 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात पिंपरीतील 41 वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर येथील 68 वर्षीय पुरुष आणि पिंपळेगुरव येथील 75 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 1 लाख 4503 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 99 हजार 510 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1836 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 772 अशा 2608 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 803 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर 534 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 21 हजार 629 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 983 जणांनी कोरोनाची लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.