Pimpri corona Update : शहरात आज 502 नवीन रुग्णांची नोंद, 359 कोरोनामुक्त, चार मृत्यू

'ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 104 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 502 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 104 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 359 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात दापोडीतील 69 वर्षीय पुरुष, वाकड येथील 64 वर्षीय पुरुष, थेरगावातील 71 वर्षीय पुरुष आणि पिंपळेगुरव येथील 59 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 7230 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 1459 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1854 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 776 अशा 2630 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 1357 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 953 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 28 हजार 379 जणांनी कोरोनाची लस घेतली. आज दिवसभरात 1777 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.