Pimpri Corona Update : शहरात आज 605 नवीन रुग्णांची नोंद, 2093 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून ही मोठी दिलासादायक बाब आहे. शहराच्या विविध भागातील 605 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 93 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 40 आणि महापालिका हद्दीबाहेरील 17 अशा 57 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 733 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 43 हजार 185 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 15 हजार 33 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 10 हजार 333 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 700 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 230 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 826 झाले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने कंटेन्मेंट झोनची संख्याही कमी होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.