-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Corona Update : शहरात आज 253 जणांना डिस्चार्ज, 172 नवीन रुग्णांची नोंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 172 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 253 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 6 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 11 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 54 हजार 910 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 195 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 226 रुग्ण गृहविलगीकरणात असून 969 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 40 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 428 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 409 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 39 हजार 88 जणांनी लस घेतली आहे.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn