Pimpri Corona Update : शहरात आज 335 जणांना डिस्चार्ज, 221 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 221 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 11 आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 अशा 19 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 184 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 52 हजार 664 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 2 हजार 940 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 106 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 834 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 111 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 789 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 98 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 15 हजार 362 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.