Pimpri corona Update : शहरात आज 1113 नवीन रुग्णांची नोंद, 1199 जणांना डिस्चार्ज, 33 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1113 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 67 हजार 596 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 18 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 15 अशा 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये भोसरी, पिंपरी, किवळे, निगडी, चिखली, रावेत, पूनावळे, थेरगाव, पिंपळेगुरव, भीमनगर, काळेवाडी, सांगवी, वानवडी, कर्वेनगर, बावधन, कात्रज, हडपसर, लातूर, आंबेगाव येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 67 हजार 596 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 53 हजार 508 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1095 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 328 अशा 1423 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6131 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.