Pimpri corona Update: शहरात आज 146 नवीन रुग्णांची नोंद, 117 जणांना डिस्चार्ज; 2 मृत्यू

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 133 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13, अशा 146 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील दोघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगवीतील 54 वर्षीय पुरुष आणि पिंपरीतील 22 वर्षीय युवतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 98 हजार 481 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 95 हजार 140 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1782 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 745 अशा 2527 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 639 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1883 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.