Pimpri Corona Update : शहरात आज 149 नवीन रुग्णांची नोंद, 280 जणांना डिस्चार्ज, 9 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 149 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 93 हजार 88 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 280 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील सात, तर पालिका हद्दीबाहेरील दोन अशा नऊ रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात पिंपरीतील 72, 55 वर्षीय दोन पुरुष, भोसरीतील 56 वर्षीय पुरुष, चिखलीतील 81 वर्षीय पुरुष, निगडीतील 59 वर्षीय पुरुष, भोसरीतील 70 वर्षीय महिला, चिखलीतील 70 वर्षीय महिला, आंबेगाव येथील 54 वर्षीय पुरुष आणि आळंदीतील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 93 हजार 88 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 89 हजार 511 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1656 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 680 अशा 2336 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 854 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1028 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.