Pimpri corona Update : शहरात आज 179 नवीन रुग्णांची नोंद, 119 जणांना डिस्चार्ज, 5 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या ( Pimpri chinchwad City)  विविध भागातील 166 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13 अशा 179 नवीन कोरोना रुग्णांची (corona New Patients) आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज दिवसभरात 327 जणांनी कोरोनाची लस (corona Vaccine) घेतली आहे. आजपर्यंत 1274 जणांनी लस घेतली आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील तीन अशा पाच जणांचा आज मृत्यू (Death) झाला आहे. त्यामध्ये चिंचवड मधील 45 वर्षीय महिला, सांगवीतील 64 वर्षीय महिला, अहमदनगर येथील 57 वर्षीय पुरुष, जुन्नर मधील 67 वर्षीय महिला, पुण्यातील 72 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 99 हजार 411 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 70 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1792 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 753 अशा 2545 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 656 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1288 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.