Pimpri corona Update: शहरात आज 189 नवीन रुग्णांची नोंद, 77 जणांना डिस्चार्ज, 10 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 183 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 189 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 91 हजार 38 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये आकुर्डीतील 57 वर्षीय पुरुष, थेरगांवातील 84 वर्षीय पुरुष, भोसरीतील 52 वर्षीय पुरुष, चिंचवडमधील 73 वर्षीय महिला, थेरगावातील 65 वर्षीय महिला आणि खेड येथील 74 वर्षीय पुरुष, सोलापूर येथील 80 वर्षीय पुरुष, नारायणगांव मधील 59 वर्षीय पुरुष, पारनेर येथील 85 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 50 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 91 हजार 38 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 87 हजार 461 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1596 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 661 अशा 2257 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 781 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 946 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.