Pimpri Corona Update : शहरात आज 1892 नवीन रुग्णांची नोंद, 1420 कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1837 आणि महापालिका हद्दीबाहेरील 55 अशा 1892 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 326 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 298 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1420 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 11 आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा 13 जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात सांगवीतील 64 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 75 वर्षीय पुरुष, वल्लभनगर येथील 83 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 54, 80 वर्षीय दोन पुरुष, चिखलीतील 58 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 68 वर्षीय पुरुष, भोसरीतील 56 वर्षीय पुरुष, निगडीतील 80, 75 वर्षीय दोन महिला, चिंचवड येथील 81 वर्षीय महिला, जुन्नर येथील 56 वर्षीय पुरुष, आळंदीतील 72 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 37 हजार 850 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 18 हजार 912 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1988 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 834 अशा 2822 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3045 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3112 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 31 हजार 276 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4038 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.