Pimpri corona Update : शहरात आज 2 हजार 37 नवीन रुग्णांची नोंद, 97 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 37 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, 97 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2368 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 52 आणि महापालिका हद्दीबाहेरील 44 अशा 97 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 62 पुरुष आणि 35 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 12 हजार 460 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 87 हजार 936 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2978 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1484 अशा 4 हजार 462 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 8 हजार 341 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 970 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 2 हजार 333 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.