-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Corona Update : शहरात आज 224 नवीन रुग्णांची नोंद, 233 जणांना डिस्चार्ज

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 224 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 16 आणि महापालिका हद्दीबाहेरील 9 अशा 25 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 151 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 51 हजार 967 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

सध्या 3 हजार 7 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार रुग्ण गृहविलगीकरणात असून 2 हजार 7 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 130 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 795 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 228 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 8 हजार 580 जणांनी लस घेतली आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.