Pimpri Corona Update : शहरात आज 221 नवीन रुग्णांची नोंद, 163 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 221 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 318 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 61 हजार 736 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 176 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 204 रुग्ण गृहविलगीकरणात असून 972 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 52 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 450 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 602 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 4 हजार 78 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.