Pimpri corona Update : शहरात आज 624 नवीन रुग्णांची नोंद,1040 रुग्णांना डिस्चार्ज

21 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 624 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) भर पडली. कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणखी 1040 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दिलासादायक स्थिती आहे. आज 21 रुग्णांना प्राण गमावावे लागले आहेत.

शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 79,338 आहे, तर त्यापैकी 72,164 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 624 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सद्यस्थितीत शहरात 4372 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 588 रुग्णांचाही समावेश आहे. तसेच 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 14 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे.

करोनामुळे एकूण मृत्यूचा आकडा 1837 इतका झाला आहे. त्यात शहरातील 1337 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 500 रुग्णांचा समावेश आहे.

शहरातील कुदळवाडी, तळवडे, मिलिंदनगर, आकुर्डी, काळेवाडी, पिंपरी, थेरगाव, संत तुकारामनगर, बोपखेल, सागंवी, चिंचवड, कासारवाडी येथील 14 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील गावडेवाडी, धुळे, आंबेठाण, खेड, चाकण, जुन्नर येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला.

दिवसभरात 3796 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1559 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.