Pimpri corona Update : शहरात आज 76 नवीन रुग्णांची नोंद, 147 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 69 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 76 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील च-होलीतील 64 वर्षीय महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 1009 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 97 हजार 354 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1822 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 767 अशा 2589 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 603 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 452 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 9509 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 753 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.