Pimpri corona Update: धोका वाढतोय ! शहरात आज 283 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दोनशे ते तीनशेच्या पटीने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शहराच्या विविध भागातील 281 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 283 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे शहरातील एकाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. शहरात आजपर्यंत 1 लाख 2698 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 98 हजार 165 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1828 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 771 अशा 2599 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 879 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर 934 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 16 हजार 525 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 744 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.