Pimpri corona Update : धोका वाढतोय ! शहरात आज 425 नवीन रुग्णांची नोंद

ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 100 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. शहराच्या विविध भागात आज (बुधवारी) 425 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण असून ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 100 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 440 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चिखलीतील एका 60 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 4050 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यातील 99 हजार 53 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1833 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 772 अशा 2605 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 737 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 637 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 20 हजार 646 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 825 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.