Pimpri Corona Update : आजपर्यंतची सर्वांत कमी रुग्णसंख्या! शहरात आज 167 नवीन रुग्ण

414 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 159 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा 167 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. आजपर्यंतची ही सर्वांत कमी रुग्णसंख्या आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 85 हजार 677 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 414 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 8 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 12 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड, भोसरी, रहाटणी, येरवडा, आंबेगाव येथील रुग्णांचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 85 हजार 677 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 81 हजार 784 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1485 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 610 अशा 2095 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1703 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.