Pimpri Corona Update: शहरातील कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्या पुढे, दुपारी 12 पर्यंत 81 नव्या रुग्णांची भर

pimpri-corona-update-The number of corona patients in the city exceeded one thousand, adding 81 new patients by 12 noon. दिलासादायक बाब म्हणजे 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजमितीला 455 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.  आज गुरुवारी 12 वाजेपर्यंतच 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 1013 झाली आहे. 10 मार्च ते 11 जून या 94 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. मागील पाच दिवसांत तब्बल 313 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजमितीला 488 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला कोरोना अशरक्ष: विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज  रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसाला 40 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. काल एकचदिवशी 88 जणांना लागण झाली आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
मार्च, एप्रिल या दोन महिन्यात शहरातील रुग्णसंख्या 200 वर होती. पण, मागील काही दिवसात शहरात तब्बल 787 नवीन रुग्ण वाढले आहेत. 6 ते 11 जून या पाच दिवसात तब्बल 313 नवीन रुग वाढले आहेत. आज 12 वाजेपर्यंतच तब्बल 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्यने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. शहरातील जसा लॉकडाऊन शिथिल केला आहे. तशी शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.

सक्रिय 264 रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत!
शहरातील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आजमितीला 488 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तब्बल 264 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तर, दुसरीकडे लक्षणे असलेल्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. 139 रुग्णांमध्ये कोरोनाची  लक्षणे आहेत. 14 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे.  आजपर्यंत 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. 16 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.