Pimpri Corona Update: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रुग्णसंख्या दोनशे पार; जाणून घ्या आपल्या भागात किती रुग्ण?

Pimpri Corona Update: The number of patients in 'A' field office limits has crossed two hundred; Know how many patients in your area?  'अ' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 204 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात प्रभागातील आनंदनगरमधील सर्वाधिक रुग्ण आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच 10 रुग्ण 'ब' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहरात कोरोनाचा कहर सुरु असून मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या  ‘अ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 204 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात प्रभागातील आनंदनगरमधील सर्वाधिक रुग्ण आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच 10 रुग्ण ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत. महापालिकेने रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. आज आतापर्यंत 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंत रुग्ण संख्या 1013 झाली आहे.

10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 1013 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, शहरातील 488 सक्रिय रुग्णांवर  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 16 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असून पुढील काळात रुग्ण वाढणार असल्याचा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. झोपडपट्टी, गावठाण भागात रुग्ण वाढ होत आहे. जूनअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. बुधवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेल्या ‘अ’ प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे सर्वाधिक आहेत. प्रभागातील आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. प्रभागात सर्वाधिक 204 सक्रिय रुग्ण  आहेत.

 क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वाधिक 204 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 10 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 11 रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 28 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे 30 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 19 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 24 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे  81 सक्रिय रुग्ण आहेत.

आज गुरुवारी 12 वाजेपर्यंत 81 जणांना लागण झाली आहे. शहरात एकूण 488  सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.