Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या घटली; रविवारी शहरात 914 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आज (रविवारी, दि. 16) दिवसभरात 914 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2 हजार 468 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 59 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 41 हजार 734 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 20 हजार 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

रविवारी 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 44 रुग्ण शहरातील तर 15 रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 3 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 17 हजार 825 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 12 हजार 712 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 5 हजार 113 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी एक हजार 429 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 4 लाख 63 हजार 494 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.