Pimpri Corona Update : रुग्णसंख्या घटतेय ! शहरात आज 1547 नवीन रुग्णांची नोंद, 1999 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1 हजार 547 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील रुग्णसंख्या स्थिरावत आहे. तर, 69 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 999 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 45 आणि महापालिका हद्दीबाहेरील 24 अशा 69 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 45 पुरुष आणि 24 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 32 हजार 904 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 2 लाख 8 हजार 987 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3423 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1751 अशा 5 हजार 174 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 7 हजार 12 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3102 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 41 हजार 455 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.