Pimpri Corona Update : रुग्णसंख्या घटतेय ! शहरात आज 846 नवीन रुग्णांची नोंद, 2067 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून ही मोठी दिलासादायक बाब आहे. शहराच्या विविध भागातील 846 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 16 अशा 59 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 693 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 42 हजार 580 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 16 हजार 561 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 11 हजार 482 रुग्ण गृहविलगीकरणात असून 5 हजार 79 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 311 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 2 हजार 40 वर गेली आहे.

आजपर्यंत शहरातील 4 लाख 65 हजार 73 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आज 1  हजार 579 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, उद्याही लसीकरण बंद राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.