Pimpri corona Update : कोरोनामुळे शहरात आज एकही मृत्यू नाही

117 नवीन रुग्णांची नोंद, 109 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही. तर शहराच्या विविध भागातील 117 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

शहरात आजपर्यंत 1 लाख 1498 जणांना कोरोनाची लागण झाली.  त्यातील 97 हजार 901 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1826 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 769  अशा 2595 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 657 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर 711 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 2202 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 882 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.