Pimpri corona Update: आज एकाचदिवशी कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू, 807 नवीन रुग्ण

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. : Today, 30 people died of corona in one day, 807 new patients

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुळे आज (मंगळवारी) 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच एकाचदिवशी 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहराच्या विविध भागातील 785 आणि पालिका हद्दीबाहेरील 22 अशा 807 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 36 हजार 863 झाली आहे.

तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मोरवाडी (पुरुष 67 वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष 75 वर्षे), आकुर्डी (स्त्री 70 वर्षे, स्त्री 78 वर्षे), चिंचवड (पुरुष 81 वर्षे), अजमेरा कॉलनी (पुरुष 63 वर्षे), चिखली ( 70, 62, 60, 35 वर्ष पुरुष), तळवडे (पुरुष 35 वर्षे) भोसरी (स्त्री 59 वर्षे, पुरुष 46 वर्षे, पुरुष 31 वर्षे), दिघी (पुरुष 73 वर्षे), बोपखेल (पुरुष 42 वर्षे), खराळवाडी (पुरुष 52 वर्षे), थेरगांव (पुरुष 68 वर्षे), निगडी (पुरुष 84 वर्षे), वाकड (पुरुष 71 वर्षे), अंजठानगर (स्त्री 60 वर्षे),  वल्लभनगर (पुरुष 65 वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष 35 वर्षे), हिंजवडी (पुरुष 49 वर्षे), देहूरोड (स्त्री 66 वर्षे), कामशेत (पुरुष 63 वर्षे) निघोजे -खेड (पुरुष 56 वर्षे),  जुन्नर (पुरुष 67 वर्षे),  मावळ (पुरुष 47 वर्षे),  तळेगांव दाभाडे (पुरुष 66 वर्षे) या रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 36 हजार 863 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 25 हजार 258 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 685 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 134 अशा 819 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 5806 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.