Pimpri Corona Update: रुग्णसंख्या शंभरच्या आत, आज 73 नवीन रुग्णांची नोंद

165 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 73 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या शंभरच्या आत आली. नवीन रुग्णसंख्या घटल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 432 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 73 हजार 523 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 754 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 358 रुग्ण गृहविलगीकरणात असून 396 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 41 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 439 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 117 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 18 लाख 87 हजार 157 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.