Pimpri Corona Update: चिंताजनक! शहरात आज नवीन 138 कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Corona Update) विविध भागातील 227 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली. तर, 227 रुग्णापैकी 89 रुग्णांचा कोरोना सक्रिय अहवाल हा 24 जून रोजी आलेला आहे. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 61 हजार 497 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 867 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 844 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 23 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये (Pimpri Corona Update) दाखल आहेत. आज दिवसभरात 1 हजार 954 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 44 हजार 219 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Vadgaon Maval : पोल्ट्री फार्मर्स यांनी स्वतंत्र व्यवसाय करावा – सोनबा गोपाळे गुरुजी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.