Pune Corona Update : चिंताजनक ! शहरात आज 5600 नवे रुग्ण; 3481 डिस्चार्ज; 38 मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 5600 कोरोना रुग्णांची वाढ झाली तर 3481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच कोरोनामुळे 38  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज पुणे शहरातील 28 रुग्णांचा, तर पुण्याबाहेरील 9  रुग्णांचा मृत्यू झाला.  शहरात 44822 सक्रिय रुग्ण आहेत. 915  गंभीर रुग्ण असून 4099 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 99 हजार 721 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 44822 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5526 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.