Pimpri corona Update : शहरात आज 164 नवीन रुग्णांची नोंद, 123 जणांना डिस्चार्ज; 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 163 आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा 164 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील दोन आणि पालिका हद्दीबाहेरील दोन अशा चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये खराळवाडीतील 52 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 55 वर्षीय महिला, खेड येथील 69 वर्षीय महिला, आर्वी, पुणे येथील 72 वर्षीय वृद्ध महिलेचा आज मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 98 हजार 348 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 95 हजार 23 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1780 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 745 अशा 2525 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 568 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1666 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.