Pimpri corona Update : इंग्लंडहून शहरात परतलेल्या 173 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

सात जण पॉझिटिव्ह, तर आठ जणांचे अहवाल प्रलंबित

एमपीसी न्यूज – इंग्लंडहून मुंबईत आलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 14 प्रवाशी भारतात परतलेले नाहीत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. उर्वरीत 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 173 निगेटिव्ह आहेत. 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर, उर्वरित 8 अहवाल प्रलंबित आहेत.

शहराच्या विविध भागातील 120 नवीन रुग्णांची आज नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चिंचवड येथील 58 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 96 हजार 728 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 475 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1757 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 731 अशा 2488 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 579 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1822 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.