_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri corona News : कोरोना मृतदेह ‘प्रोटोकॉलनुसार’ प्लास्टिकने बांधून न देताच अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे दिला

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे माहिती असतानाही महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून मृतदेह कोरोना ‘प्रोटोकॉलनुसार’ प्लास्टिकने बांधून न देताच अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईकांना माहिती नसल्याने त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना कोरोना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पिंपरीगावातील एका 91 वर्षीय वृद्ध महिलेची गुरुवारी खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केली. शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाईपर्यंत रिक्षामध्ये महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांना जिजामाता रुग्णालयातून वायसीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले. वायसीएममधील डॉक्टरांनीही तपासणी केली असता रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कोरोनाने मृत्यु झाला असतानाही मृतदेह शवविच्छेदनासाठी डेड हाऊसला नेला. नातेवाईकांनी आक्षेप घेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे शवविच्छेदन कसे करता, मृत व्यक्ती 91 वर्षीय वृद्ध महिला आहे असे सांगितले. 60 वर्षांपुढील मृत रुग्णाचे शक्यतो शवविच्छेदन केले जात नाही. असे असतानाही डॉक्टरांनी शवविच्छेदन करावेच लागेल अशी आडमुठी भूमिका घेतली.

यामध्ये बराच वेळ गेला. नातेवाईकांनी ही बाब नगरसेवक संदीप वाघेरे यांना सांगितली. नगरसेवक वाघेरे यांनी अधिका-यांशी संपर्क साधत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे शवविच्छेदन केले जाते का, असा सवाल विचारला. त्यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा हट्ट सोडला.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनामुळे निधन झाले असल्याने कोरोना प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करणे आवश्यक होते. त्यासाठी मृतदेह प्लास्टिकने बांधून अंत्यविधीसाठी पाठविणे आवश्यक होते. असे असतानाही प्लास्टिक बांधून रॅप न करताच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे पाठविला. कोरोनाने मृत्यू झालेल्याचा अंत्यविधी कसा करायचा, हे नातेवाईकांना माहिती नव्हते.

त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना कोरोना होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणामुळेच कोरोनाचा प्रसार होत असल्याचा आरोप केला जात आहे.

पिंपरीगावात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असतानाही प्रशासन असा हलगर्जीपणा करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, कोरोनाने मृत्यू झालेला मृतदेह कोरोना प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कारासाठी देताना प्लास्टिकने बांधून दिला जातो. पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करणे आवश्यक असते. असे असताना वायसीएम रुग्णालयातून मृतदेह प्लास्टिकने बांधून रॅप करून न देताच अंत्यसंस्कारासाठी पाठविला. नातेवाईकांना कोरोनाने मृत्यू झालेल्याचा अंत्यविधी कसा करायचा हे माहिती नसल्याने त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.