Pimpri Corona Update : शहरात रविवारी 95 रुग्णांची भर; 50 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 31) 95 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 322 एवढी झाली आहे. आजवर 96 हजार 569 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 807 तर शहराच्या बाहेरील 759 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 631 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 315 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 97 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 855 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.