Pimpri corona Update : आज 530 जणांनी घेतली कोरोनाची लस, 108 नवीन रुग्णांची नोंद

55 जणांना डिस्चार्ज, 5 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 108 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात 530 जणांनी तर आजपर्यंत 1804 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील तीन अशा पाच जणांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये दिघीतील 65 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 64 वर्षीय पुरुष, साता-यातील 56 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 90 वर्षीय वृद्ध महिला, वुरुळी कांचन येथील 72 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 99 हजार 519 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 125 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1794 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 756 अशा 2550 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 608 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1583 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.