Pimpri: रहाटणीतील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण

Pimpri: Corona virus infection in an elderly woman from Rahatani

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 68 वर्षीय वृद्ध महिलेचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार,  रहाटणी परिसरातील रहिवासी असलेली महिला पुण्यातील रुग्णालयात दाखल आहे. या 68 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी महापालिका रुग्णालयात 52 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील अशा 194 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील 8 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 111 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात,  भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी आणि 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा अशा नऊ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.