Pimpri Corona Update : शहरात कोरोनाचा कहर ; दिवसभरात 87 जणांना लागण, दोघांचा मृत्यू

Corona's havoc in the city; During the day, 87 people were infected and two died शहरात आजपर्यंत 929 कोरोनाबाधित, 407 सक्रिय रुग्णांवर उपचार  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून शहराच्या विविध भागातील तब्बल 87 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली.  तर,  वाकड येथील 85 वर्षीय वृद्ध आणि च-होलीतील 68 वर्षीय महिला अशा दोघांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 929 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील कस्पटेवस्ती, सद््गुरु कॉलनी वाकड, आनंदनगर, जयरामनगर सांगवी,खंडोबामाळ भोसरी,  च-होली,  रमाबाईनगर, विजयनगर काळेवाडी, अजंठानगर, दिघी, मोरेवस्ती, अशोकनगर चिखली, साईबाबानगर पिंपळेसौदागर, बालाजीनगर भोसरी, नढेनगर येथील तब्बल 78 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 42 पुरुष आणि 36 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, सातत्याने अपडेट होणा-या पालिकेच्या डॅशबोर्डवर दिवसभरात 87 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

तर,  वाकड येथील 85 वर्षीय वृद्ध आणि च-होलीतील 68 वर्षीय महिला अशा दोघांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तर, आनंदनगर, भोसरी, दापोडी, नवीसांगवी, इंदिरानग चिंचवड, भिमनगर, भारतमातानगर, नेहरुनगर येथील येथील उपचाराला दहा दिवस पुर्ण झालेल्या. कोणतेही लक्षणे नसलेल्या 25 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज बुधवारपर्यंत 929 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 506 बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 16 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 407 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 86

# पॉझिटीव्ह रुग्ण – 87

_MPC_DIR_MPU_II

#निगेटीव्ह रुग्ण – 135

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 272

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 677

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 140

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 929

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 407

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  35

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 506

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 21144

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 64020

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.