Pimpri: ‘अ’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्द कोरोनाचे हॉटस्पॉट; जाणून घ्या आपल्या भागात किती रुग्ण?

Pimpri: Corona's hotspot; Find out how many active patients there are in your area शहरातील आजपर्यंत रुग्ण संख्या 1826 झाली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 198 आणि ‘ह’ कार्यालयाच्या हद्दीत 161 सक्रिय रुग्ण आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच 23 रुग्ण ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

महापालिकेने रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. आतापर्यंत 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंत रुग्ण संख्या 1826 झाली आहे.

10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 1826 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1059 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 734 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 33 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. झोपडपट्टी, गावठाण भागात रुग्ण वाढ होताना दिसून येत आहे. जूनअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालयनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

रविवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेल्या ‘अ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक तर त्याखालोखाल ‘ह’ कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वाधिक 198 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वात कमी म्हणजेच 23 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 45 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात कोरोनाचे 58 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे 50 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 92 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 56 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 161 सक्रिय रुग्ण आहेत.

त्यामध्ये दापोडी परिसरात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. तर, आज सोमवारी साडेबारा वाजेपर्यंत 43 जणांना लागण झाली आहे. शहरात एकूण 734 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.