Pimpri : कोरोनाची जागतिक आकडेवारी धक्कादायक ; आजपर्यंत 16,100 लोकांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ‘जागतिक साथीचा रोग’ म्हणून घोषित केले आहे. या आजरामुळे आजपर्यंत 16,100 लोकांचा मृत्यू झाला असून, 3,67,000 लोकांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगातील 190 देशात हा आजार पसरला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडण्याचा दर 3.4% आहे. या आजारातून आजपर्यंत 1,01,000 कोरोना बाधित लोक पूर्ण बरे झाल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. असे असले तरी धोका आजून टळला नाही. कोरोनाची जागतिक आकडेवारी फार गंभीर असून विचार करायला लावणारी आहे.

चीन येथील वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना विषाणू सर्व जगात पोहोचला आहे. चीनमध्ये 81,603 कोरोना बाधित रुग्ण असून, आतापर्यंत 3277 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. वुहान शहराची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली तरीही धोका टळला नाही. चीन पेक्षा इटलीमध्ये कोरोनाने जास्त धुमाकूळ घातला असून, आत्तापर्यंत ६,०७१ लोकांनाचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ६३,००० लोकांना याची लागण झाली असल्याचे चित्र आहे. इटलीमध्ये दिवसाला ६०० ते ७०० लोकांचा मृत्यू होत असून, उत्तर लोम्बार्डी व मिलानमधील भाग यामुळे जास्त प्रभावित झाला आहे. या प्रादुर्भाव रोखण्यासाठी इटलीने १२ मार्च पासून सर्व देशात कडक बंदी लागू केली आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या देशामध्ये स्पेनचा सुद्धा समावेश असून, आत्तापर्यंत 33,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे व 2311 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित देशांमधील रुग्णांची आकडेवारी

देश                                              कोरोना पोसझिटिव्ह रुग्ण                        मृत्यू

युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका        31573                                                582

जर्मनी                                            28800                                               123

इराण                                            23049                                                 1812

फ्रान्स                                           23049                                                 860

युनाइटेड किंग्डम                            6650                                                   335

रिपब्लिक ऑफ कोरिया                 8961                                                    120

स्वित्झर्लंड                                    6971                                                       120

* (आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध)

कोरोनामुळे मृत्यूचा दर 3.4% (ताज्या आकडेवारीनुसार) असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वयोमानानुसार कोरोनामुळे मृत्यू होण्यात वयोवृद्धांचा जास्त टक्का आहे. यामध्ये 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांचा मृत्यू दर 8 टक्के आहे, तर 60 हून अधिक वय असलेल्या लोकांचा मृत्युदर 3.6 टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लहान मुलांची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेकडे नाही. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब, श्वसन रोग आणि कर्करोग असणाऱ्या लोकांना याचा जास्त धोका असल्याचे निदर्शनास आले आहे.

भारतात आत्तापर्यंत कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 513वर जाऊन पोहचली आहे, तर 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 107 रुग्ण असून, 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा मुख्यालयातील बैठकीत या विषाणूविषयीच्या सध्याच्या माहितीच्या आधारे मूल्यांकन करून त्वरित उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच या प्रश्नावर गंभीर संशोधन आणि एकत्र काम करण्याचे मार्ग यावर सर्वानी सहमती दर्शविली. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्राधान्याने संशोधनास गती द्यायला हवी व निधी उपलब्ध करायला हवा असे स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like