Pimpri: नगरसेवक कामठे थेट कोविड कक्षात; कोरोनाग्रस्त रुग्णांची केली विचारपूस

Ycmh Corona Update Bjp corporator Tushar Kamthe In Covid Ward

एमपीसी न्यूज – भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पीपीई किट परिधान करून पिंपरी-चिंचवड पालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयातील कोविड 19 कक्षात जाऊन कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस करुन त्यांना धीर दिला. तसेच रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

पालिकेचे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. या ठिकाणी केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवरच उपचार केले जात आहेत.

वायसीएममध्ये कोरोनावर उपचार घेऊन अनेक जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आज, गुरुवारी सकाळी ‘वायसीएम’ला भेट दिली. पीपीई किट परिधान करून कामठे यांनी कोविड कक्षात प्रवेश केला.

त्यानंतर उपचारासाठी दाखल असलेल्या बाधीत रुग्णांशी चर्चा केली. त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.