Pimpri : नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रावेत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान दिले आहे. 
कोरोना विषाणूमुळे आलेल्या महामारी सोबत लढण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. सर्वजण आपापल्या परीने, क्षमतेनुसार योगदान देत आहेत. रावेत प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. सदर निधी रावेत येथील आयसीआयसीआय बँकेतून धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या महामारीला रोखण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने निधी देऊन योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. हे जैविक युद्ध हरवण्यासाठी माझ्या वतीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.