Pimpri : पुरपरिस्थितीत पुरविलेल्या साहित्यासाठी आठ लाखाचा खर्च

Cost of Rs. 8 lakhs for flood relief materials

एमपीसी न्यूज – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या संकटात तसेच त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा करण्यात आला होता. तीन पुरवठादारांमार्फत हे साहित्य पुरविण्यासाठी 8 लाख 43 हजार रूपये खर्च करण्यात आला. 

मागील वर्षी पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर अतिवृष्टीमुळे महापूराचे संकट कोसळले होते. पिंपरी महापालिकेमार्फत या संकटात तसेच त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी साधनसामग्रीचा पुरवठा करण्यात आला.

चिंचवड येथील रेखा इंजिनिअरींग वर्क्स, निगडीतील शिवसमर्थ एंटरप्रायजेस आणि पिंपरीतील शुभम उद्योग या पुरवठादारांमार्फत साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

संबंधित पुरवठादारांनी पुरवठा केलेल्या साहित्याच्या बिलांच्या पूर्ततेसाठी वाहतुक खर्चासह सादर केली आहेत. त्यानुसार, ही बीले जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पाठविण्यात आली.

मात्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरपरिस्थितीत अनेक सामाजिक संस्था आणि महापालिकांनी साहित्य पुरवठा केला होता. त्यांच्या सर्व बिलांची पूर्तता संबंधित संस्था आणि महापालिकांनीच केली आहे, असे पिंपरी महापालिकेला कळविले आहे.

त्यानुसार, या तीन पुरवठादारांच्या बीलांची पूर्तता पिंपरी महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1