Pimpri: अवैध बांधकामावर कारवाई करताना अडथळा आणणा-या नगरसेवकांवर कारवाई करणार -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 1 जानेवारी 2016 पुढील अवैध बांधकामांवर धडक कारवाई केली जाणार आहे. बांधकामे तोडताना पदाधिकारी, नगरसेवकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फायदा घेऊन अनेकांनी अनधिकृत बांधकामे बांधली आहेत. या कालावधीत अवैध झालेल्या बांधकामांना नोटीसा लावणे आवश्यक आहे. नोटीस लावली नसल्यास बीट निरीक्षक, अपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.

शहरातील 2016 पुर्वीच्या अवैध बांधकामाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 नंतर झालेली अवैध बांधकामे तोडण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. अवैध बांधकामवर कारवाई करताना पदाधिका-यांने, नगरसेवकाने विरोध केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like