Pimpri : ‘डी मार्ट’मध्ये प्रवेशासाठी घ्यावे लागणार कुपन ; एकावेळी फक्त पाच लोकांनाच प्रवेश

एमपीसी न्यूज – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता सर्वच स्तरावर गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. राज्य सरकारने आज पहाटेपासून 144 कलम लागू केल्यानंतर सुद्धा रस्त्यावर खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसून येत होती. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी किराणा खरेदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘डी मार्ट’मध्ये प्रवेशासाठी आता कुपन घ्यावे लागणार असून, एकावेळी फक्त पाच लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

किराणा खरेदीसाठी नागरिक पिंपरी येथील काळेवाडीच्या ‘डी मार्ट’मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. या गर्दीला आवर घालण्यासाठी डी मार्ट प्रशासनाने आता मॉलमध्ये प्रवेशासाठी कुपन घेणे अनिवार्य केले आहे.

तसेच एका वेळी फक्त पाच लोकांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. ‘डी मार्ट’ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ग्राहकांना सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहकांच्या शरीराचे तापमान तपासले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.