Pimpri: कोविड रुग्णालय, उपलब्ध बेडची माहिती आता मिळवा ‘एका क्लिकवर’

Pimpri: covid Hospital, Available Bed Information Now Get 'One Click' वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील बेडची उपलब्धतता देखील कमी आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा रुग्ण अचानक अत्यवस्थ होतो. त्याला रुग्णालयात दाखल करताना आपल्याला कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत हेच माहीत नसते. अशावेळी होणारा विलंब रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यासाठी पुणे विभागातील DCHC, DHS यातील उपलब्ध खाटांची माहिती, कोविड केअर सेंटर, हेल्पलाईन क्रमांक आदीची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. https://divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr या लिंकवर क्लिक केल्यास संपूर्ण माहिती मिळणार आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रुग्णसंख्येचे दररोज उच्चांक होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील बेडची उपलब्धतता देखील कमी आहे.

कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत. त्याची माहिती रुग्णांना मिळत नव्हती. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यासाठी येतात. परंतु, बेड उपलब्ध नसल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे रुग्णांना उपचाराला विलंब होत होता.

शहरातील कोविड रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर पुणे विभागातील माहिती एक क्लिकवर देण्यास सुरुवात केली आहे.

कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये किती खाटा आहेत. कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. शुल्क आकारले जाते. याची संपूर्ण माहिती दिली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या वायसीएम, ईसआयसी हॉस्पिटल, नवीन भोसरी हॉस्पिटल, बालेवाडी क्रीडा संकुल कोविड केअर सेंटर, मोशीतील हॉस्टेल, ‘पीसीसीओई’ हॉस्टेल निगडी, सिम्बॉयसिस इन्फोटेक कॅम्पस हिंजवडी येथे कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.

तर, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल निगडी, चिंचवड, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, सटर्लिंग हॉस्पिटल, डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल या रुग्णालयात कोविड रुग्णांवर शुल्क आकारुन उपचार केले जात आहेत.

या रुग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये किती बेड उपलब्ध आहेत. त्याची संपूर्ण माहिती दिली आहे. यामुळे रुग्णांना त्रास होणार नाही. ज्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत. तेथेच रुग्ण दाखल होतील. तात्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.