Pimpri : संवेदनशील विद्यार्थी घडवा – डॉ. महेश देवकर

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना संवेदनशील शिक्षण द्या. त्यांचा एक रोल मॉडेल बना, विद्यार्थ्यांची परीक्षा वर्षातून दोनदा होते. परंतु शिक्षकांची परिक्षा रोजच असते. या वास्तवतेचे भान बाळगा. संवेदनशील विद्यार्थी घडवा; असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली भाषेचे विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी केले. कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत गुरुपोर्णिमा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावरती प्रा. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अरविंद बोरगे, विभागप्रमुख डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रा. नंव्व्या दंडवाणी, प्रा. पांडुरंग इंगळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका यांना औक्षण करून गुरुंना दंडवत करून शिष्य या नात्याने आशिर्वाद घेतले.

  • डॉ. महेश देवकर पुढे म्हणाले की, मार्गदर्शन करणारी व्यक्ति कोणी असो, तो गुरुसमानच असतो. जो मार्ग दाखवतो, तो आपला गुरु असतो. ही आपली संस्काररुपी परंपरा आहे. आई-वडील ज्याप्रमाणे मुलांची काळजी घेतात. तसे शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकही विद्यार्थ्यांची काळजी घेतात. गुरुंच्या सूचनेनुसार शिक्षाने देखील परिश्रम घेतले पाहिजे.

भगवान बुद्धांनी देखील सांगितले आहे की, मी मार्ग दाखविन परंतु, मार्गावर चालण्याची जबाबदारी शिष्याची आहे. तुम्ही देखील जोपर्यंत गुरुंनी दिलेले ज्ञान आचरणात आणणार नाही. तोपर्यंत भविष्यात उत्तम नागरीक घडू शकणार नाही, याची जाणीव प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे.

  • प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे म्हणाले, गुरूच महात्म्य समजून घ्या, आज गुरूच्या नावाखाली समाजात गैरप्रकारही चालत आहे. यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहीजे. शिक्षकांमुळे आपण घडतो हे लक्षात ठेवा.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक अरविंद बोरगे यांना मानले. सूत्रसंचालन दिव्या साळवे, रसिका बाहेती, आशिष वैद्य यांनी तर आभार क्रीडा अधिकारी आनंद लुंकड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.