Pimpri: ‘कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेषाधिकार असलेली स्पेशल टास्क फोर्स बनवा’

'Create Special Privileged Task Force to Enforce Corona Rules' : 'कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेषाधिकार असलेली स्पेशल टास्क फोर्स बनवा'

सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरा यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी कोरोना लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी विशेषाधिकार असणारी स्पेशल टास्क फोर्स बनविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरा यांनी केली आहे.

याबाबत बोरा यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक होत आहे. अनलॉक नंतर उद्योगनगरी पुन्हा जोमाने पूर्वपदावर येत आहे.

पण मास्क लावणे, रस्त्यावर गुटखा पान खाऊन न थूकने, सोशल डिस्टन्स राखणे या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. वाढणारी रुग्ण संख्या आणि तोकडी पडणारी आरोग्य सुविधा पाहता पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ शकते.

_MPC_DIR_MPU_II

पण तो लॉकडाउन या कामगार नगरीला परवडणारा नसेल.

त्यासाठी कोरोनाच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणे हेच उत्तम राहील. शहरात सध्या नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर खूप कमी प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. कदाचित अपुरे मनुष्यबळ आणि अधिकार यामुळे कारवाई करण्यात पालिका कर्मचारी यांना अडचणी येत असतील.

जसे गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार फक्त अन्न आणि औषध प्रशासनास आहेत. तेव्हा आपण कोरोनाच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास विशेषाधिकार असणारी स्पेशल टास्क फोर्स बनवावी.

त्यामध्ये इतर विभागातील कर्मचारी वर्गास पुढील आठ दिवस कारवाईस जागोजागी उतरावे. गरज भासल्यास आपण सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक यांनाही यामध्ये सामावून घ्यावे, असे बोरा यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.