Pimpri: दापोडीतील स्मशानभूमी सर्वोत्कृष्ट तर रावेत येथील स्मशानभुमीची दुरवस्था – महापौर जाधव

शहरातील 36 स्मशानभूमींचा कायापालट करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 36 स्मशानभूमी, दफनभुमीची पाहणी केली आहे. त्यामध्ये दापोडीतील स्मशानभूमी चांगली असून उत्तम सोयी-सुविधायुक्त आहे. तर, रावेत येथील स्मशानभुमीची दुरवस्था झाली आहे. शहरातील स्मशानभुमीत सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात येईल. उद्यान आहे की स्मशानभूमी आहे असा प्रश्न नागरिकांना पडेल अशा पद्धतीने स्मशानभुमीचा कायापालाट करणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबतचे धोरण करण्यासाठी लवकरच अधिका-यांची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना महापौर जाधव म्हणाले, “महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभूमी, दफनभुमीची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी केली. त्यातील त्रुटी, समस्या जाणून घेतल्या. दापोडीतील स्मशानभुमीत सर्व सोयी-सुविधा आढळून आल्या. तर, रावेत येथील स्मशानभुमीत दुरवस्था आहे. तिथे रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रस्ता रुंद करण्यात येईल.

शहरातील सर्व स्मशानभुमीत पत्राशेड करण्यात येणार आहे. सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात येईल. अत्यंविधीला येणा-या नागरिकांना बसण्यासाठी जागा करण्यात येईल. स्नानगृह, स्वच्छतागृह, विद्युतची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. मालकी हक्काच्या जागेत काही स्मशानभूमी आहेत. आरक्षणे ताब्यात घेऊन त्याचे हस्तांतरण केले जाणार आहे. स्मशानभुमीत जाण्यासाठी रस्ते प्रशस्त केले जाणार आहेत. डीपी रस्ते विकसित केले जातील. त्याचबरोबर दफनभुमीची देखील दुरवस्था झाल्याचे दिसून आले. त्याठिकाणी गवत वाढले आहे. तेथील गवत काढण्यात येईल. कंपांऊड टाकले जाईल. पाण्याची सोय करण्यात येणार आहे, असेही महापौर जाधव यांनी सांगितले.

स्मशानभूमी विकसित करण्याबाबतचे धोरण केले जाईल. त्यासाठी लवकरच आयुक्तांसह संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे. स्मशानभुमीचा कायापालाट करण्यासाठी आवश्यकता भासल्यास सल्लागार देखील नेमण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.