Chinchwad : आयआयएमएसचा ‘क्रिसेंडो’ महोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) तर्फे नुकताच दोन दिवसीय ‘क्रिसेंडो’ हा वार्षिक कला क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील 22 व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे सुमारे तीनशेहुन जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या उपस्थितीत पार पडला.

बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट, फेस पेंटिंग, गायन, नृत्य, रांगोळी, नेमबाजी, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, टेबल सॉकर, ऍड मानिया, अभिरूप शेअर बाजार अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सर्व स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘इन्स्टिट्यूट ऑफ द इयर’ या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या प्रवरा सेंटर फॉर मॅनेजमेन्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (पीसीएमआरडी) च्या संघाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक रवींद्र घांगुर्डे, गायिका सावनी रवींद्र व आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आला.

क्रिसेंडोची यंदा ‘इनक्रेडिबल इंडिया’ अर्थात ‘अतुल्य भारत’ ही संकल्पना असल्याने विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नृत्य आणि गायन अविष्करामध्येही याच आधारावर सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध सिने छायाचित्रकार अतुल वाघ व फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे मेकअप विभाग प्रमुख अनिल वैश्यक यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या मराठी, हिंदी गीतांमुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसमवेत पालकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. सूत्रसंचालन राहुल बारी, पूजा साळवेकर, स्वप्नील सोनावणे, पूजा मोरे, कुणाल सोनावणे,गणेश कलशेट्टी व ओंकार वाघ या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पवन शर्मा, प्रा. अमर गुप्ता, डॉ. वंदना मोहंती, डॉ. अमित गिरी, डॉ. पुष्पराज वाघ, प्रा.सारंग दाणी,संदीप गेजगे, आदिती चिपळूणकर, अंजली धकाते, प्रा. महेश महांकाळ, योगेश निकम, अभिजीत चव्हाण आदींनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.